राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे

Foto
औरंगाबाद :-  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या एका प्रवाशाचे कोरोनासाठीचा प्रयोगशाळा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. राज्यात सध्या सातजण निरीक्षणाखाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 515 विमानांमधील  61 हजार 939 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या 10 देशातील प्रवाशांसोबतच आता इराण आणि इटली या देशातील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 370 प्रवासी आले आहेत. त्यापैकी 241 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 125 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 121 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. इतर 4 जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या 125 प्रवाशांपैकी 118 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 5 जण मुंबईत तर प्रत्येकी 1 जण पुणे आणि नाशिक येथे भरती आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker